vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण संदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, पाटणा) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त एक सदस्यीय समितीने दिनांक १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनास सादर केला होता. या अहवालावर आक्षेप, मते व निवेदन मागविणे तसेच त्यावर सुनावणी घेण्यासाठी शासन निर्णय १० एप्रिल २०२६ अन्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

या समितीसमोर अहवालाबाबत मते, आक्षेप करण्यासाठी इच्छुकांना ई-मेलद्वारे नोंदणी करण्याकरिता यापूर्वी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, संबंधितांना आपले आक्षेप किंवा मते सादर करण्यासाठीची अंतिम मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुकांनी dg-sw@barti.in या ई-मेल आयडीवर आपले निवेदन किंवा अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

 

 

संबंधित पोस्ट

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

vishwatmaklokswamivarta

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत