vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा आरोग्य विभागाकडून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला गतीNQAS अंतर्गत आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यावर भर; ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

जिल्हा आरोग्य विभागाकडून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला गतीNQAS अंतर्गत आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यावर भर; ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे): जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ठराविक कार्यप्रणालीद्वारे आरोग्य सेवांचा दर्जा निश्चित करून त्यानुसार गुणवत्ता तपासणी व सातत्याने सुधारणा करण्यात येत असून, त्यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढविणे हा आहे. तसेच आरोग्य संस्थांच्या उपयोगितेत वाढ करून अधिकाधिक लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे हेही या कार्यक्रमाचे प्रमुख ध्येय आहे.*NQAS अंतर्गत मूल्यांकन प्रक्रिया*केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार National Quality Assurance Standard (NQAS) अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) तसेच उपकेंद्र (SC) यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी सविस्तर चेकलिस्ट जारी करण्यात आलेली आहे.

सन २०२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील DH, GH, SDH, RH, PHC व SC या सर्व स्तरांवरील आरोग्य संस्थांचे NQAS मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हा गुणवत्ता आश्वासन कक्षामार्फत करण्यात आलेल्या प्राथमिक मूल्यांकनात ७०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या संस्थांना राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाठविण्यात येते. त्यानंतर राज्यस्तरीय मूल्यांकनातही ७०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांची NQAS मानांकन प्रमाणपत्रासाठी शिफारस करण्यात येते.

जिल्ह्यातील एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना NQAS मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यात यश आले असून, उर्वरित केंद्रांना मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सज्ज करण्याचे काम वेगाने सुरू आहेया उपक्रमामुळे आरोग्य संस्थांमधील सेवा वितरण अधिक शिस्तबद्ध, रुग्णकेंद्री व गुणवत्तापूर्ण होत असून, नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. स्वच्छता, सुरक्षितता, वेळेवर सेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ व प्रभावी

व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य विभागाकडून पुढील काळात अधिकाधिक आरोग्य संस्थांना NQAS मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असून, “गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत” हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.

000

संबंधित पोस्ट

शंभर दिवसीय’ क्षय रुग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे -जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतीश कोपुरवाड 

पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद – ३३८१ अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभागी

vishwatmaklokswamivarta

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

स्वैच्छिक रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ||

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय  व्यवसायिकांचा सल्ला घ्या- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 28 जून 2026 रोजी..