vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

    अमरावती, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे ‘Sent Back’ (परत) करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 30 एप्रिल ते 10 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून त्रुटी दूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    शासकीय वसतिगृहांची संख्या मर्यादित आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी निवासाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शासन भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नसल्याने किंवा अर्जात तांत्रिक चुका असल्याने हे अर्ज प्रलंबित आहेत.

  ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज परत आले आहेत, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आणि ई-मेलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या पोर्टलवर आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून त्याची हार्डकॉपी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.  सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी स्पष्ट केले की, 10 मे 2026 पर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास विद्यार्थी या वर्षाच्या लाभापासून कायमचा वंचित राहील. तसेच त्याला पुढील वर्षीही नव्याने अर्ज करता येणार नाही. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास सर्व जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे किंवा 0721-2661261 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

00000000

संबंधित पोस्ट

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण ठरावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनातील बैठकीत कृती आराखड्याचा आढावा

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी इंडियाटूरिझम मुंबईच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात घेतला सहभाग

अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई

vishwatmaklokswamivarta

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta