vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाचे ८,१८,२८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ८,१८,२८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस..

मुंबई प्रतिनिधी

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या ८ वर्षे मुदतीच्या ८०० कोटींच्या ७.५५ % दराचे महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३४ च्या (२२ एप्रिल २०२६ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१९ मे २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् 19 मे २०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २० मे २०२६ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ८ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २२ एप्रिल २०२६ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड २२ एप्रिल २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.५५ % दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी २२ ऑक्टोबर आणि २२ एप्रिल रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

000000

संबंधित पोस्ट

फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार डिजीटल इंडिया सेवा केंद्र-केंद्र शासनाचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

अमरावती विमानतळ आणि प्रवाशी विमानसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केंद्रीय आणि कॅबिनेट राज्य मंत्र्यांचा दौरा

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta