vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी’एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली- गृहराज्यमंत्री योगेश कदम

पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी’एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली- गृहराज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबई, प्रतिनिधी:- पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.

सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातीला कायदा अधिक कडक केला जाणार असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, या गुन्ह्यातील अपराधीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींची लवकर सुटका होऊ नये यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.

राज्यमंत्री कदम म्हणाले, लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.

००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ–निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता – स्थायी सभापती अशोक पांगारकर

नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली व बस ट्रॅकर ॲप पूर्ववत कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा सरासरी पाऊस (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०६.२०२५ (मिमीमध्ये)

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री