vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली व बस ट्रॅकर ॲप पूर्ववत कार्यान्वित

नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली व बस ट्रॅकर ॲप पूर्ववत कार्यान्वित

 

   नवी मुंबई प्रतिनिधी     नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आयटीएमएस (ITMS – Integrated Transport Management System) सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने एनएमएमटी ची बस ट्रॅकर ॲप सेवा (NMMT Bus Tracker App) सेवा बंद झाली होती. तथापि एनएमएमटीच्या आयटीएमएस विभागामार्फत ही तांत्रिक अडचण तातडीने दुरूस्ती करून दूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे एनएमएमटी बस ट्रॅकर ॲप प्रणालीदेखील सुरळीत सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना या ॲपद्वारे बसगाड्यांविषयी माहिती ट्रॅक करता येणार आहे तसेच बसेसच्या लोकेशन्सची माहिती पूर्ववत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे ॲपव्दारे मिळणा-या इतरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे दरम्यानच्या काळात प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत असून या कालावधीत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल नमुंमपा परिवहन प्रशासनाकडून आभार मानण्यात येत आहेत.

00000

संबंधित पोस्ट

पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवा अशा विविध बाबींचा**आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून सविस्तर आढावा*

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली,शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ..शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य..

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या एअरसाइड कामकाजाची सुरुवात पहिल्या व्यावसायिक विमानाचे आगमन,पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देऊन सन्मानित

vishwatmaklokswamivarta