vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली,शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ..शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य..

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली,शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ..शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य..

ठाणे, प्रतिनिधी):- सामान्य प्रशासन विभागाच्या दि.13 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा दिला असून त्यात मुद्दा क्रमांक 2 मध्ये नागरिकांना दैनंदिन जीवन सुकर व्हावे, याकरिता सातत्याने प्रयत्न करावेत, असे नमूद आहे.

त्यानुषंगाने नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सेवा त्यांना एक छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी दि.9 फेब्रुवारी 2025 पासून एकाच छत्राखाली विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेंतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे शक्य होणार आहे. या सर्व सेवा शासनमान्य आधारकेंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र येथे नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहेत. (संबंधित केंद्रांची यादी सोबत जोडली आहे)

तरी, जिल्ह्यातील गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील, तहसिलदार संदीप थोरात यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवासाठी रेल्वे स्थानकांवर तिकीट व सुविधा,चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे सज्ज. 380 गणपती विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था.

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महिला सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा

vishwatmaklokswamivarta

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta