vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

नांदेड, प्रतिनिधी : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही महत्वाकांक्षी योजना जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामोद्योग मंडळामार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना उद्योग उभारणीसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने शहरी व ग्रामीण भागातील वाढती सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेऊन स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. उत्पादन, सेवा व कृषीपूरक उद्योग व्यवसायांसाठी ही योजना लागू आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये* वय मर्यादा : किमान 18 वर्षे पूर्ण* अर्जदार : स्थानिक रहिवासी व स्थायी उत्पन्न नसलेले युवक-युवती

प्रकल्प मर्यादा :    * सेवा व कृषीपूरक उद्योग : कमाल 50 लाख रुपये    * उत्पादन उद्योग : कमाल 1 कोटी रुपये

शैक्षणिक पात्रता :    * 10 लाखांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी   * 5 लाखांवरील सेवा व कृषीपूरक प्रकल्पांसाठी   * अर्जदार किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्य* अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानाधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.आवश्यक कागदपत्रे* पासपोर्ट साइज फोटो* आधार कार्ड* पॅन कार्ड* शाळा सोडल्याचा दाखला* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)* ग्रामीण भागासाठी लोकसंख्येचा दाखला* व्यवसायासंदर्भातील इतर आवश्यक कागदपत्र

अर्ज प्रक्रियाअर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :🔗 https://maha-cmegp.gov.inयोजनेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

महत्वाची सूचना,योजना राबविण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मध्यस्थामार्फत अर्ज भरू नयेत. फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.संपर्क : दूर- 02462-299088ई-मेल didic.nanded@maharashtra.gov.in

000000

संबंधित पोस्ट

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण…

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन…

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई