vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजन

मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजनाला प्रोत्साहन

 खेळप्रतिनिधी-भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अर्थात एसएआयचे मुंबई केंद्र आणि बीपीसीएल फिट दिवाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईच्या चेंबूर येथील आझादनगरच्या भारत पेट्रोलियम कर्मचारी नागरी वसाहतीत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल या कार्यक्रमाची 75 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली. या विशेष उपक्रमाद्वारे तंदुरुस्ती, सायकलिंगची संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि लोकांचा सहभाग याला प्रोत्साहन देण्यात आले तसेच 2030 मध्ये भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीकोनाचा गौरव करण्यात आला.

ही सायकल रॅली सकाळी 7.00 वाजता सुरू झाली आणि त्यात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले सायकलस्वार, फिटनेसप्रेमी, तरुण आणि महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती मधुरिका पाटकर; आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती सबा अंजुम करीम; बीपीसीएल दिवाजच्या ब्रँड ॲम्बेसेडर राधिका खन्ना, बीपीसीएल चे प्रमुख महाव्यवस्थापक (क्रीडा) दीपक जैन; आणि एसआयए मुंबईचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांसारख्या नामवंत खेळाडू आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांना संबोधित करताना, या खेळाडूंनी नागरिकांना सायकलिंग आणि तंदुरुस्ती, सक्रीय जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारण्याचे आणि अधिक निरोगी व सुदृढ भारत घडवण्यात योगदान देण्याचे आवाहन केले. फिट इंडिया चळवळ, संपूर्ण देशभरात आरोग्य, सक्रीय जीवनशैली आणि जनसहभागावर आधारित फिटनेसविषयी सातत्याने जनजागृती करत असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एसएआय, मुंबई प्रादेशिक केंद्राच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, फिट इंडिया चळवळ, लोक सहभाग आणि नियमित उपक्रमांच्या माध्यमातून तंदुरुस्तीला सतत चालना देत आहे. संडेज ऑन सायकलची ही 75 वी आवृत्ती आरोग्य, सुदृढता आणि सक्रिय जीवनशैलीप्रति वाढत्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. बीपीसीएल दिवाज सोबतच्या या सहयोगामुळे, क्रीडा आणि आरोग्याच्या प्रसारात महिलांच्या नेतृत्वाखालील फिटनेस उपक्रम आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही अधोरेखित झाले आहे, त्यानंतर सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली; या प्रतिसादामुळे फिट इंडिया ही संकल्पना आणि भारतात 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या ध्येयाला जनतेचा असलेला पाठिंबा अधोरेखित झाला.

संबंधित पोस्ट

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

“मिशन लक्ष्यवेध” जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे-जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहनØ सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत दिवागांव इलेव्हन ग्रामीण तर युनायटेड ऐरोली शहरी गटातील विजेतेपदाचे मानकरी…