vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत दिवागांव इलेव्हन ग्रामीण तर युनायटेड ऐरोली शहरी गटातील विजेतेपदाचे मानकरी…

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत दिवागांव इलेव्हन ग्रामीण तर युनायटेड ऐरोली शहरी गटातील विजेतेपदाचे मानकरी…

        नवी मुंबई प्रतिनिधी    वयाच्या चाळीशीनंतर आजारपण येऊ नये याची काळजी घेतली जाते, अशावेळी क्रिकेटसारख्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी मैदानात उतरणारे सर्वच खेळाडू कौतुकास पात्र असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामने प्रथमत:च प्रकाशझोतात खेळविले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्व.राजीव गांधी क्रीडासंकुल सीबीडी बेलापूर येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक 40 + क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी नवी मुंबईच्या महापौर सौ.सुजाता पाटील यांनी विजेत्यांसह सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंचे अभिनंदन केले.

याप्रसंगी क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती श्री.गिरीश म्हात्रे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक श्री. सुरज पाटील, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता विद्युत श्री.प्रवीण गाडे, 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदिप पाटील, उपाध्यक्ष श्री. नरेश गौरी, सचिव श्री. एल डी पाटील, सहसचिव श्री.विकास मोकल, खजिनदार श्री. मनोज म्हात्रे, श्री. भालचंद्र दळवी, माजी नगरसेवक श्री.जी.एस.पाटील, श्री.सिताराम मढवी व इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील 33 क्रिकेट संघांमध्ये झालेल्या स्पर्धेत दिवागाव इलेव्हन संघाने बेलापूरगाव इलेव्हन संघावर मात करीत नवी मुंबई महापौर 40 + क्रिकेट विजेतेपदाचा चषक पटकाविला. कोपरीगांव इलेव्हन आणि बोनकोडेगांव इलेव्हन यांना तृतीय क्रमांकाचा चषक प्रदान करण्यात आला. दिवागाव इलेव्हन संघातील श्री.किशोर पाटील यांना स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मालिकावीर चषक प्रदान करण्यात आला. कोपरीगाव इलेव्हनचे श्री.योगेश भोईर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून, बेलापूरगांव इलेव्हनचे श्री.उत्तम (ज्यु.) सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आणि बोनकोडे इलेव्हनचे श्री.योगेश तांडेल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानकरी ठरले.

   शहरी भागातील स्पर्धेत 25 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये युनाईटेड ऐरोली संघ विजेतेपदाचा तसेच रायझिंग स्टार ऐरोली संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. खारीगाव इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघातील खेळाडू श्री.जावेद शेख यांना मालिकावीर चषक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या संघातील खेळाडूंनी वर्गणी काढून त्यांना उत्तम कामगिराबद्दल रोख पारितोषिक देऊन सन्मानीत केले. त्याचप्रमाणे, खारीगाव इलेव्हन संघाचे श्रीनिवास उत्कृष्ट फलंदाज, रायझिंग स्टार ऐरोली संघाचे श्री.सुनिल केणी उत्कृष्ट गोलंदाज व युनायटेड स्पोर्ट्स ऐरोलीचे श्री.निलेश सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदाचे मानकरी ठरले. विजेत्या संघांना मोठ्या आकारातील आकर्षक चषकाप्रमाणेच संघातील प्रत्येक खेळाडूस वैयक्तिक स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले

      नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळील क्रीडांगणात 23, 24 व 25 मार्च 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेची उपान्त्य व अंतिम फेरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 3 येथील राजीव गांधी क्रीडासंकुलात खेळविण्यात आली.

विशेष म्हणजे क्रीडासंकुलामध्ये नुकतेच प्रखर फ्लडलाईट्स लावण्यात आले असल्याने हे अंतिम फेरीतील सामने प्रकाशझोतात खेळविण्यात आले. प्रकाशझोतात खेळता आल्यामुळे खेळाडूंना होणारा आनंद मोठा असल्याचे मत क्रीडा समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे यांनी व्यक्त केले. या फ्लडलाईट्स सुविधेमुळे क्रीडासंकुलाची शोभा वाढल्याचे व त्याचा खेळाडूंना होणारा उपयोगही वाढल्याचे मत आरोग्य समिती सभापती तथा स्थानिक नगरसेवक डॉ.जयाजी नाथ यांनी व्यक्त केले.

  वयाच्या चाळीशीनंतर आपल्या फिटनेसविषयी जागरूक असणा-या 40 प्लस खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटप्रेमी रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर! 

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेतअमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद