vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

फिट इंडिया उपक्रमांतर्गत सांगलीत सायकल रॅली- शरीर निरोगी राहण्यासाठी किमान अर्धातास दररोज व्यायाम करा

फिट इंडिया उपक्रमांतर्गत सांगलीत सायकल रॅली- शरीर निरोगी राहण्यासाठी किमान अर्धातास दररोज व्यायाम करा

 

          खेळ प्रतिनिधी-  सांगली,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्व विषद करून दररोज स्वत:साठी अर्धा तास तरी व्यायाम करण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय खेळ प्राधिकरणाच्या माध्यमातून फिट इंडिया उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सांगली शहरात नुकतीच सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्यस्तर, जिल्हास्तर खेळाडू तसेच हौसी सायकल पट्टू व नागरिकांनी सायकल चालवून सहभाग नोंदविला.

  शारिरीक तंदूरूस्तीच्या प्रचार प्रसारासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सांगली शहरातून विश्रामबाग चौक ते राममंदिर सांगली या मार्गाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. फिट इंडियाच्या https://fitindia.gov.in/cyclothon-2024 या संकेतस्थळावर नागरिक, क्रीडा प्रेमी यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून शरीर निरोगी राहण्यासाठी किमान अर्धातास दररोज व्यायाम करण्याचे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरवात

vishwatmaklokswamivarta

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन