vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

     नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नवी मुंबईतून अधिकाधिक गुणवंत खेळाडू निर्माण होऊन शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडावी यादृष्टीने “विविध खेळाचे क्रीडा प्रशिक्षण”, जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा “महापौर चषकांतर्गत विविध खेळांचे क्रीडा स्पर्धा” असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी खेळाडूंना शालेय तसेच शासन मान्यता प्राप्त खेळांचे सघंटनेव्दारे आयोजित राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा, व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त खेळांडूना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्याकरीता मा.सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने “क्रीडा शिष्यवृत्ती” लागू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सन 2023 – 2024 मधील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

त्याकरीता पात्र खेळाडूंनी “क्रीडा शिष्यवृत्ती” करीता विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता दि.20 फेब्रुवारी 2025 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाकडे सादर करावी. असे जाहीर आवाहन महापालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत असून विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

 विहित नमुन्यातील अर्ज राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी बेलापुर येथील क्रीडा विभागात तसेच www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

  तरी नवी मुंबईतील पात्र खेळाडूंनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू

vishwatmaklokswamivarta

कोरिया इथं झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ८ सुवर्णासह एकूण २४ पदकांची कमाई.

फिट इंडिया उपक्रमांतर्गत सांगलीत सायकल रॅली- शरीर निरोगी राहण्यासाठी किमान अर्धातास दररोज व्यायाम करा

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी२३ जूनपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

vishwatmaklokswamivarta