vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत  

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

राज्य प्रतिनिधी नांदेड  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा नांदेड शहरात रविवार 31 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत 18 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये तसेच परीक्षा स्वच्छ सुसंगत वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टिने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 163 नुसार 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे

या आदेशानुसार परीक्षा केंद्रापासून 500 मीटरच्या परिसरात रविवार 31 मे 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 500 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास, जवळ बाळगण्यास, परीक्षा केंद्रात नेण्यास त्याचप्रमाणे दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 500 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राटडॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयेआर्थिक वर्ष अखेरीस सुट्टीच्या दिवशीही सुरू- मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे 

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना-उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

vishwatmaklokswamivarta

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा १०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान; नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती