vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

 

अमरावती, प्रतिनिधी:शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दि. 6 जून 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात भव्य ‘मेगा कृषी ऋण आउटरीच कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे सकाळी 11 वाजता या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित राहणार असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कॅम्प केवळ एकाच ठिकाणी मर्यादित नसून अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व 45 शाखांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या मेळाव्यामध्ये शेती आणि पूरक व्यवसायांना गती देणाऱ्या महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड , कृषी पायाभूत सुविधा निधी, ग्रामीण गोदाम भंडारण, कोल्ड स्टोरेज (शीतगृह) आणि महिला बचत गट यांसारख्या शासकीय व बँक योजनांचा समावेश आहे. या कॅम्पमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून जागेवरच मंजुरी पत्र आणि थेट कर्जवाटप केले जाणार आहे.

हा कृषी मेळावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष संधी निर्माण करणारा आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि कृषी उद्योजकांनी शनिवार, दि. 6 जून रोजी आपल्या जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा दर्यापूर येथील मुख्य कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले’जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’चा समारोप

पीककर्जासाठी शिबिरांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

श्री गजानन महाराज पालखीचे जालना महानगरपालिकेतर्फे भक्तिभावाने स्वागत महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची उपस्थिती; ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळनवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!