vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ, मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

भोपाळ प्रतिनिधी : मध्य प्रदेशातील  धार जिल्ह्यात गरबा बघून आपल्या चुलत भावासोबत घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आलीय. पीडित मुलीनं आई आणि भावासह घटनेनंतर दोन दिवसांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्हा नोंदवलाय.

पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं, की ती तिच्या चुलत भावासोबत घरी जात असताना वाटेत खूप अंधार होता. तो मार्ग दिसत नसल्याने त्यांनी टॉर्चचा वापर केला, तेव्हा गावातील दोन लोकांनी त्यांना पाहिलं आणि धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझ्या चुलत भावाला मारहाण करुन त्याला तिथून हाकलून दिलं आणि माझ्यासोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून आरोपींवर एससी/एसटी अंतर्गत अॅट्रोसिटी गुन्हा (Atrocity Crime) दाखल करण्यात आलाय. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बलात्काराची भयानक घटना समोर आली होती. या घटेनेनं दिल्लीत घडलेल्या महाभयंकर निर्भया हत्याकांडाची आठवण करुन दिली होती. त्यापाठोपाठ डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर 30 पेक्षा जास्त जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याशिवाय, देशभरात बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. सरकार कडक कारवाई आणि कडक कायदे करण्याचा दावा करतं. मात्र, अशा घटना थांबताना दिसत नाहीत. वेगवेगळ्या राज्यांतून येणाऱ्या बलात्काराच्या घटना महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

संबंधित पोस्ट

आप’चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप..

परमबीर सिंह बेपत्ता; सीआयडीकडून शोध सुरू, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता,परमबीर यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा प्लान तयार….

vishwatmaklokswamivarta

भारतीय नौदल तिरुवनंतपुरम येथे भव्य परिचालन प्रात्यक्षिकासह नौदल दिन 2025 साजरा करणार

vishwatmaklokswamivarta

*नागा साधूंचे रहस्य**अद्भूत दुनिया काहीही न मागणारे साधू… 40% गायब होतात कुंभात!*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…

vishwatmaklokswamivarta