
IIT प्रवेश परीक्षेत मृदुल अग्रवाल पहिला, तर काव्याने मुलींमध्ये मारली बाजी….
नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूरतर्फे (IIT) JEE Advanced 2021 चा निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली आयआयटीचा (Delhi IIT) मृदूल अग्रवालने पहिला क्रमांक पटकाविला आहे. दिल्ली आयआयटीची काव्या चोप्रा हीने मुलींमधून बाजी मारली आहे.
आयआयटीची प्रवेश परीक्षा जईई अॅडव्हान्स ३ ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. एकूण 141699 विद्यार्थ्यांनी पहिला आणि दुसरा असे दोन्ही पेपर दिले होते. त्यानंतर आज १२ व्या दिवशी या परीक्षेचा निकाल सकाळी १० वाजता jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल घोषित करण्यात आला. यावेळी तसेच JEE Advanced रोल नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीनंही लॉगइन करुन आता देखील विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली असून एकूण 41862 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
दिल्ली आयआयटीच्या मृतदल अग्रवालने पहिला क्रमांक मिळविला असून त्याला ३६० पैकी ३४८ गुणे मिळाले आहेत. तसेच आयआयटी दिल्लीच्या काव्या चोप्रा या विद्यार्थिनीने मुलींमधून बाजी मारली असून तिला ३६० पैकी २८६ गुण प्राप्त झाले आहेत.



