कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांत आज ३१ अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जिल्ह्यात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आज आयोजित १५ विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली आहे.
आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३, पैठण तालुक्यात २, फुलंब्री तालुक्यात १, वैजापूर तालुक्यात २, गंगापूर तालुक्यात २, कन्नड तालुक्यात १, खुलताबाद तालुक्यात १, सिल्लोड तालुक्यात २ आणि सोयगाव तालुक्यात १ अशा एकूण १५ शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
तालुकानिहाय प्राप्त अर्जांमध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १, पैठण तालुक्यात ११, वैजापूर तालुक्यात ४, गंगापूर तालुक्यात ५ आणि खुलताबाद तालुक्यात १० असे एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात आज अर्ज प्राप्त झाले नाहीत.