vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

मुंबई :  प्रतिनिधी  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबईत मोठी कारवाई केली. विलेपार्ले परिसरात करोडोंचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

‘जेएनपीटीमध्ये अफूचे तीन कंटेनर, कारवाई कधी?’

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे काही अधिकारी बडे ड्रग्ज विक्रेते आणि माफिया यांना सोडून देतात, मात्र काही ग्रॅम ड्रग्ज जप्त केल्यावर लोकांना गोवले जाते, असा आरोप केला होता. त्यांचे प्रकरण मोठे करुन वसुली केली जाते. आजही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) अफूचे तीन कंटेनर उभे आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला.

2020मध्ये वानखेडे आल्यानंतर एक केस नोंदवली आहे. सारा अली खानला बोलावण्यात आलं. त्याच प्रकरणात श्रद्धा कपूरला बोलावण्यात आलं. त्याच प्रकरणात नंतर दीपिका पदुकोणलाही बोलावलं गेलं. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीजला या केसमध्ये बोलावण्यात आलं आहे. अजूनपर्यंत ती केस बंद झालेली नाही आणि त्याबाबत चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाही. 14 महिने झाले तरी ही केस बंद होत नाही. त्यात असे काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. याच केसमध्ये कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मालदीवमध्ये ही वसुली करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला.

एनसीबीने 125 कोटी ते 21 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन केले जप्त नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातही एनसीबीने ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई केली होती. DRE च्या झोनल युनिटने 25 किलो हेरॉईनचा साठा जप्त केला होता. हा साठा एका कंटेनरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 125 कोटी रुपये होती. याप्रकरणी नवी मुंबईतील एका व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील न्हावाशेवा येथेही हा कंटेनर इराणहून आला होता. या कंटेनरमध्ये हेरॉईन सापडले. सप्टेंबरमध्ये डीआरआयने 2,988.21 किलो हेरॉईन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 21 हजार कोटी रुपये होती. गुजरातमधील मुंद्रा बंदरावरही कारवाई करण्यात आली. हेरॉईन आधी दिल्लीला नेले जाणार होते. दिल्लीतून ते देशाच्या विविध भागात नेले जाणार होते. विशेषतः पंजाबला पाठवण्याची योजना होती. एवढा मोठा कट उघडकीस आल्यावर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. मात्र याआधी डीआरआयने आठ जणांना अटक केली होती.

संबंधित पोस्ट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून विविध कलमांतर्गत 514 गुन्हे दाखल

डोंबिवली येथील,14 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार… काकाला बेड्या.

अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या श्रद्धांजली सभेपूर्वी अमरावती पोलिसांकडून कडक बंदोबस्त, नुपूर शर्मा पाठिंबा आणि हत्या प्रकरण

सातारा शहरात  वनविभागाकडून  वनविभागाची धाड; 4 लाखांच्या कच्च्या माल आरोपी अटक…

परमवीर सिंग प्रकरण : ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल, उपायुक्त पराग मणेरेसह५ जणांवर गुन्हा.

vishwatmaklokswamivarta

हरवलेली मुलगी आढळल्यास-पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta