vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महागाईचा भडका : पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीच्या दरात मोठी वाढ

 |महागाईचा भडका : पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीच्या दरात मोठी वाढ

[ मुंबईचा दिल्ली प्रतिनिधी  सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. देशात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरानंतर आता सीएनजीच्या दरामध्येही वाढ झाली आहे. गाजियाबादमध्ये 2.56 रुपये प्रति किलो तर दिल्लीत सीएनजी 2.28 रुपयांनी वाढले आहे. गेल्या 45 दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदी झालेली वाढ आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ट्विट करून सीएऩजीच्या वाढत्या किंमतींबाबत माहिती दिली आहे.

दिल्ली – एनसीआरमध्ये CNG ची नवी किंमत

दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाली असून ते 52.04 रुपयांवर पोहचले आहे. ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीचे दर 58.58 रुपयांवर पोहचले आहेत. याआधी सीएनजीची किंमत 49.76 रुपये होती. सीएनजीच्या दरांत झालेल्या वाढीनंतर आता 52.04 रुपये मोजावे लागणार आहे.

45 दिवसात तिसऱ्यांदा वाढ

1 ऑक्टोबर रोजी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने तिसऱ्यांदा सीएनजीचे दर वाढवले आहेत. याआधी मागील महिन्यात 1 आणि 13 ऑक्टोबरलादेखील दर वाढवण्यात आले होते. म्हणजेच सीएनजीमध्ये 45 दिवसात 15 टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल नंतर आता सर्वसामांन्याना सीएनजी देखील रडवणार आहे.

मुंबईत देखील वाढ

मुंबई मेट्रो परिसरात देखील सीएनजीच्या किंमती 2.27 रुपयांनी वाढल्या असून सध्या सीएनजी किंमत 57.54 रुपये इतकी आहे.

संबंधित पोस्ट

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर….

vishwatmaklokswamivarta

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा 

vishwatmaklokswamivarta

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मानवी तस्करीच्या संशयावरुन फ्रान्समध्ये थांबवलेले विमान मुंबईत दाखल

vishwatmaklokswamivarta

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta