
#इतिहासकार_सोडून गेले…भावपूर्ण श्रध्दांजली🙏
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. संध्याकाळी ६.३१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं राज्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते.
प्रखर शिवभक्त, थोर इतिहासकार, शाहीर, शिव चरित्रकार, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगा पुढे मांडण्यासाठी जाणता राजा हे शिव नाट्य प्रचंड असे निर्माण करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व, नम्र, विनयशील महाराष्ट्र भुषण, आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण आणि कण न कण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी समर्पित करणारे श्रद्धेय श्री. बाबसाहेब पुरंदरेजी यांना आज देवाज्ञा झाली , अख्ख्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींना पोरके करून आपण गेलात आपणांस मनाचा मुजरा , आपण शरीराने जरी आम्हांला सोडून गेलात तरी आपल्या शिव विचाराने आपण हा सूर्य चंद्र असे पर्यंत सगळ्या शिव प्रेमींच्या हृदयात राहाल , आपणांस भावपुर्ण श्रद्धांजली , असे शिवभक्त होणे नाही 🙏🏻💐🙏🏻🚩🙏🏻



