
डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला अत्याचार 22 जणांना ताब्यात घेण्यात आले इतर आरोपींचा शोध सुरू
डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपर परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुमारे 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 8 जणांचा शोध सुरू आहे.
मुलीच्या प्रियकराने मुलीवर अत्याचार करीत त्याचा व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करीत आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. अशी बातमी सकाळ काळ वर्तमानपत्रातही आली आहे



