vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरितअपघाती मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत..

ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरितअपघाती मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत..

जालना, प्रतिनिधी  : ऊसतोड कामगारांना सामाजिक सुरक्षा व आर्थिक आधार मिळावा, तसेच कामगारांच्या कुटुंबीयांना संकटाच्या काळात मदत व्हावी, या उद्देशाने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांना पाच लाख रुपये, तर बैलजोडीच्या मृत्यूच्या प्रकरणात संबंधित कामगारांना 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अर्थसहाय्याचे धनादेश दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धनादेश, तर बैलजोडीच्या मृत्यूच्या प्रकरणात संबंधित ऊसतोड कामगारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण डॉ. अनिता राठोड, विशेष अधिकारी (शासकीय) स्नेहल मोदाळे आदी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी लाभार्थी वारसांचे सांत्वन करून शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांची यादी करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिले , असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

पाणी बचत व पर्यायी पाण्याच्या प्रभावी वापराबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन*

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड सृष्टीतील अजरामर भूमिका साकारणाऱ्या आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर यांचा आज गोव्यात निधन

जागतिक सायकल दिन’ निमित्त भव्य सायकल रॅली संपन्न