vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय… केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री पियुष गोयल

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय… केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली : प्रतिनिधी:  केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. येणाऱ्या काळात स्टार्ट अपला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा मिळून देण्यात येणार असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.

स्टार्ट अपमध्ये भारत करतोय जगाचे नेतृत्व
यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, आजचे युग हे स्टार्ट अपचे आहे. स्टार्ट अपमध्ये भारत जगाचे नेतृत्व करत आहे. मात्र स्टार्ट अपमधून सुरू झालेलया व्यवसायात सरकारने हस्तक्षेप न करणे हेच त्या उद्योगाच्या हिताचे आहे. सरकारचा हस्तक्षेप नसल्याने संबंधित उद्योजकाला आपल्या वस्तुचे स्वरूप, किंमत आणि गुणवत्ता याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात, त्यातून उद्योगाची प्रगती होते. तसेच उद्योगाला सरकारने आधार न दिल्यास उद्योजक आपल्या स्वता:च्या हिमतीवर उभे राहातात. त्यामुळे स्टार्ट अपच्या कुठल्याही धोरणांमध्ये दखल न देण्याची भूमिका केंद्राकडून घेण्यात आली आहे.

70 पेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश यूनिकॉर्न श्रेणीमध्ये
आज भारतातील तब्बल सत्तरपेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश हा यूनिकॉर्न श्रेणीमध्ये झाला आहे. जागतिक स्तारावर ही संख्या सर्वाधिक आहे. जर या स्टार्ट अपने सरकारची मदत घेतली असती. तर कोरोना काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फटका त्यांना बसला असता. केंद्राकडून महिलांना स्टार्ट अप सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. हळूहळू स्टाप्ट अप सुरू करणाऱ्या महिलांची संख्य वाढत असून, हे एक दिलासादायक चित्र आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी येत्या काळात स्टार्ट अपचा मोठा उपोयग होऊ शकतो

संबंधित पोस्ट

सर्व शाळांमध्ये 30 सप्टेंबर पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

vishwatmaklokswamivarta

रविवारी (दि.११) शहरातील काही भागात‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

शहीद बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

हुरुण इंडियाने जाहीर केली २०२१ मधील श्रीमंतांची यादी.अंबानी प्रथम तर अदानी दुसऱ्या स्थानी

ठाणे महानगरपालिकेच्या इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम प्रकल्पात 2 कोटी 65 लाख रुपयांचा घोटाळा; RTI मध्ये उघड

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…