
जगातील सर्वांत मोठं विमान रशियाकडून उद्ध्वस्त; चिडलेला युक्रेन म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’
विदेश प्रतिनिधी
सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने जगातील सर्वांत मोठं विमान मरियाला नेस्तनाबूत केलं आहे. युक्रेनमध्ये रशियाने आक्रमण केलं असून आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. कालच चौथ्या दिवशी हे विमान उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.
युक्रेनने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करत हे विमान नेस्तनाबूत झाल्याची माहिती शोक व्यक्त करत दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, जगातीलल सर्वांत मोठं विमान मरिया (द ड्रीम) कीवजवळील एका हवाई क्षेत्रामध्ये रशियन सैनिकांद्वारे नष्ट करण्यात आलं आहे. मात्र, आम्ही या विमानाची पुनर्बांधणी करु. आम्ही एक मजबूत, स्वतंत्र, लोकशाही युक्रेनचं आमचं स्वप्न जरुर पूर्ण करु. या ट्विटसोबत त्यांनी एका विमानाचे चित्रही पोस्ट केलं आहे. तसेच सोबत लिहलंय की, त्यांनी सर्वांत मोठं विमान जाळून उद्ध्वस्त केलं मात्र, आमची ‘मरिया’ कधीच नष्ट होणार नाही



