vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेनेला गोव्यात अजून खातंही उघडता आलेलं नाही. यावरून भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवेसेनेवर टीका केली

शिवसेनेला गोव्यात अजून खातंही उघडता आलेलं नाही. यावरून भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवेसेनेवर टीका केली

 

पणजी प्रतिनिधी – गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात भाजपसाठी धक्कादायक असा कौल हाती येत आहे. सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पिछाडीवर आहेत. तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरसुद्धा पिछाडीवर आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यात चढाओढ सुरु आहे. शिवसेनेला गोव्यात अजून खातंही उघडता आलेलं नाही. यावरून भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवेसेनेवर टीका केली आहे. अद्याप कोणत्याही जागेचे निकाल स्पष्ट झालेले नसताना सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

सोमय्यांनी ट्विटरवरून टोला लगावताना म्हटलं की,’उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे जी आणि आदरणीय संजय राऊत जी गोव्यात शिवसेना कुठे आहे!!??’ गोव्यात 40 पैकी 13 जागांचे कल हाती आले असून भाजप 7 तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे

गोव्यात पुन्हा भाजप?गोव्यात सध्या मुख्यमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ४० पैकी १३ जागाच जिंकता आल्या होत्या. तर काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या.

 

संबंधित पोस्ट

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठीआपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत   – जागृती सिंगला

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं – विश्व हिंदू परिषद

vishwatmaklokswamivarta

पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.,आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकार लवकरच पुण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन नियम जाहीर करणार

vishwatmaklokswamivarta

बेळगावचा सीमाप्रश्न ! कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आज बेळगावी देणार भेट

vishwatmaklokswamivarta