
मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसची धाकधूक वाढली..
मुंबई प्रतिनिधीमणिपूर राज्यात भाजप आघाडीवर असुन आता काँग्रेसचीही धाकधूक वाढली आहे. २०१७ प्रमाणे यावेळी सुद्धा काँग्रेस सत्ता मिळवण्यास अपयशी ठरणार, असे चिन्ह आहे. येत्या काही तासात निकाल हाती येणार आहेत तरीसुध्दा निकालांचीही उत्कंठा वाढत आहे.
कोणते पक्ष निवडणूक लढवत आहेत?भाजप राज्यात सर्व 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस 54 जागी निवडणूक लढवतंय. तर, नॅशनल पीपल्स पार्टी 42 जागांवर, जनता दल (युनायटेड) 38 जागी, नागा पीपल्स फ्रंट 10 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहे.
2017 निवडणुकीत काय झालं होतं?2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं 28 जागा जिंकल्या, तर भाजपला मणिपूरमध्ये 21 जागांवर विजय मिळाला तरीसुध्दा सर्वाधिक जागा जिंकुन काँग्रेस इथे सत्ता स्थापन करु शकला नाही. भाजपनं नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंट आणि लोक जनशक्ती पार्टी सोबत आघाडी केली आणि सत्ता हाती घेतली. एन. बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपनं 2017 मध्ये पहिल्यांदाच मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं. त्या आधी 15 वर्षं मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आता या वेळेसही असे झाले तर काँग्रेस पुन्हा सत्ता गमावू शकते



