vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्या बहिणीचे पुण्यात निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली

बाळासाहेब ठाकरेंच्या बहिणीचे पुण्यात निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली…

पुणे प्रतिनिधी: थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं दुःखद निधन झालं.(Balasaheb Thackeray’s sister dies in Pune)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या त्या आत्या होत्या व किर्तीताई फाटक यांच्या मातोश्री होत्या. आज सकाळी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..

vishwatmaklokswamivarta

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना :परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत…

कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध , रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  बारसूत जाणार..

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजही मोठी वाहतूक कोंडी, बोरेघाटात वाहनाच्या रांगाच रांगा