
UAE चे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन, 40 दिवसांचा दुखवटा जाहीर…
दुबई प्रतिनिधी : संयुक्त अरब अमीरातचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाले आहे. अधिकृत वृत्तसंस्था याला दुजोरा दिला आहे. नाहयान 73 वर्षांचे होते. झायेद अल नाहायन यांच्या निधनाबद्दल सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. याशिवाय देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आला आहे.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहायान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्राध्यक्ष होते. 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे UAE चे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. आपल्या कार्यकाळात, शेख खलिफा यांनी UAE आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या.



