vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबईतील अंधेरीच्या 15 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला नायगावच्या निर्मनुष्य ठिकाणी ट्रॅव्हल बॅगेत; पोलिस तपास सुरू

मुंबईतील अंधेरीच्या 15 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला नायगावच्या निर्मनुष्य ठिकाणी ट्रॅव्हल बॅगेत; पोलिस तपास सुरू…

 

अल्पवयीन मुलीच्या खूना प्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस स्टेशन मध्ये अपहरणाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा मृतदेह बॅगेत आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंधेरी मधुन गुरूवारी बेपत्ता झालेली मुलगी शुक्रवारी दुपारी पालघर मधील नायगाव मध्ये मृतावस्थेत आढळली आहे. तिचा मृतदेह ट्रॅव्हल बॅग मध्ये आढळल्याने सार्‍या परिसरामध्ये खळबळ पसरली आहे. वाळीव पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राच्या वाराच्या खूना आहेत. विलेपार्ले परिसरामध्ये ही मुलगी सकाळी 11.45 च्या सुमारास अंधेरीवरून निघाली होती. संध्याकाळी 6 वाजून गेले तरी ती न परतल्याने तिच्या पालकांनी वर्गमित्राला फोन केला तेव्हा त्याने मुलगी शाळेतच आली नसल्याचं सांगितलं. नंतर पालकांनी अंधेरी पोलिसामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला

शुक्रवार (26 ऑगस्ट)च्या दुपारी पोलिसांना परेरा नगर येथील झुडपात ट्रॅव्हल बॅग आढळली. मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून बॅगेत भरण्यात आला होता. पोलिसांनी सध्या मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. तसेच खूनाचा अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर माजी शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी शोक आणि संताप व्यक्त करत मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत त्यांनी तातडीने तपासाची आणि आरोपींना कडक शासनाची मागणी केली आहे.

 

संबंधित पोस्ट

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? एनआयएने सांगितलं नाव…

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने ( DRI ) एका विदेशी ड्रग्ज तस्कराकडून 15 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केले. 15 कोटी रुपयांचे कोकेन ड्रग्ज जप्त.

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta

गुजरातच्या जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर

vishwatmaklokswamivarta