
हैदराबाद मध्ये भारत जोडो यात्रा दरम्यान माजी मंत्री नितीन राऊत जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल; पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा दावा…
हैदराबाद प्रतिनिधी
हैदराबाद येथे भारत जोडो यात्रा च्या दरम्यान काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत जखमी झाले असून पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली आहे त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत परंतु दक्षा नितीन राऊत यांच्या मुलीने मात्र असे सांगितले की राऊत यांच्या प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले असून महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यानंतर ते पुन्हा सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे.
हैदराबाद मध्ये Bharat Jodo Yatra दरम्यान धक्काबुक्कीत माजी मंत्री नितीन राऊत कोसळल्याने जखमी झाले आहेत. दरम्यान ANI च्या वृत्तानुसार नितीन राऊत यांना पोलिसांकडून ढकलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांंचा उजवा डोळा काळवंडल्याचे फोटो समोर आले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांंच्या चेहर्याच्या काही भागात फ्रॅक्चर आहेत. हाता-पायाला दुखापत झाली आहे. Vasavi Hospital मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



