vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परिवहन विभागात ऑनलाईन फेसलेस पद्धत कार्यान्वित

परिवहन विभागात ऑनलाईन फेसलेस पद्धत कार्यान्वित

 

रायगड प्रतिनिधी- परिवहन विभागाद्वारे ऑनलाईन फेसलेस पद्धतीने शुल्क भरणा करून आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

सदर सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून अर्जदारास त्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकाचा वापर करून किंवा मोबाईलद्वारे O.T.P. घेऊन https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करून नोंदणी क्रमांक आरक्षित करता येऊ शकेल तसेच सद्य:स्थितीत नवीन मालिका सुरू झाल्यानंतर होणारी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन राहील.

तसेच कार्यालयातील लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित नोंदणी क्रमांक ऑनलाईन फेसलेस पद्धतीने शुल्क भरून आरक्षित करता येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

तरी, जास्तीत जास्त नागरिकांनी परिवहन विभागाच्या सदर फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचेकडून करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

स्वेच्छेने रक्तदान करुन गरजू रुग्णांना मदत करावी   – डॉ.कैलास पवार

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील अलीपूरमधील तेल कारखान्यात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 34 बंब घटनास्थळी हजर

रविवारी (दि.११) शहरातील काही भागात‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :आपलं मत….आपली ताकद …स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीvनागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन