
शाळांमध्ये पायाभुत सोयी-सुविधा पुरविणे अनुदान योजनेसाठी-इच्छुक शाळांनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत
रायगड( प्रतिनिधी:- अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड- अलिबाग ज.द.मेहेत्रे यांनी केले आहे.
०००००



