vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महिला प्रीमियर लीग या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचा शेवट आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार

महिला प्रीमियर लीग या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचा शेवट आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार…

 

क्रिकेट प्रतिनिधी

महिला प्रीमियर लीग या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचा शेवट आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स- दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये अजिंक्यपदाची लढत रंगेल.

मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म चिंतेचा विषय असला तरी नॅट सिव्हर क्रंट हिच्या दमदार फॉर्ममुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या मेग लॅनिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने या वर्षी सहाव्यांदा टी-२० विश्वकरंडक पटकावला. आता तिला महिला प्रीमियर लीगच्या जेतेपदावर मोहोर उमटवण्याचा ध्यास लागला आहे. मुंबईच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत हिने या लीगमधील पहिल्या पाचपैकी तीन लढतींमध्ये शानदार अर्धशतक झळकावले

चार लढतींमध्ये तिला फक्त २५, २३, २, १४ अशाच धावा करता आल्या आहेत. मुंबईसाठी आजच्या लढतीत तिचे फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सिव्हर हिने या स्पर्धेमध्ये आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करताना फलंदाजीत २ अर्धशतकांसह २७२ धावा आणि १० विकेट टिपण्याची किमया करून दाखवली आहे.

सर्वोत्तम पाचपैकी चार गोलंदाज हे मुंबई संघाचे आहेत हे दिसून येईल. साईका इशाक (१५ विकेट), अमेलिया केर (१३ विकेट), हेली मॅथ्यूज (१३ विकेट) व इसाबेल वाँग (१२ विकेट) या मुंबईच्या गोलंदाजांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला आहे. 

 

संबंधित पोस्ट

जितेंद्र अग्रवाल यांनी पुण्याची एनडीए मॅरेथॉन पूर्ण केली..

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानच्या विजयानंतर स्टेडियम बनले रणांगण, संतप्त अफगाणिस्तानच्या चाहत्यांकडून पाकच्या चाहत्यांना मारहाण

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 25 जुनपर्यंत अर्ज करा

आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सामना खेळवला जाणार 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाणार .