vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकर हैरान: आज सलग सातव्या दिवशी बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरुच…

मुंबईकर हैरान: आज सलग सातव्या दिवशी बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरुच…

 

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत आज सलग सातव्या दिवशी बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरुच आहे. पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे अशा विविध मागण्यांसाठी या संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहकांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांशी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा जो पर्यंत होत नाही तो पर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही अशी भुमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

मुंबई मध्ये नोकरी, काम धंद्याला जाणार्‍यांना बेस्टच्या बसचा आधार होता. किफायतशीर दरामध्ये प्रवासी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. तसेच शाळकरी मुलांना देखील बेस्ट बसचा आधार होता. परंतू आता सार्‍यालाच खीळ बसला आहे. बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकार कडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचं आयोजन होण्याची शक्यता आहे. संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने कंत्राटींनी संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

 

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजर्‍या होत असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत

vishwatmaklokswamivarta

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्‍यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आज सुट्टी

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर• 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

vishwatmaklokswamivarta

गुढी पाडवा, मतदान वाढवा’;जिल्हा प्रशासनाचा सोमवारी (दि.८) उपक्रम