vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये19 सप्टेंबर 2023 ते 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत ,सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये19 सप्टेंबर 2023 ते 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत ,सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

 

ठाणे, प्रतिनिधी

: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये दि. 11 सप्टेंबर 2023 ते दि. 09 नोव्हेंबर 2023 या कालावधीत संध्याकाळी 06.00 ते सकाळी 06.00 या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कार्यभार ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे यांनी दिली आहे.

 

डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी 06.00 वा ते सकाळी 6.00 वा. या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेवून नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे दि. 11 सप्टेंबर 2023 ते दि. 09 नोव्हेंबर 2023 या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कार्यभार ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे यांनी कळविले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 4 विद्यार्थ्यांनी जिंकले प्रथमच सुवर्णपदक…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘मास्टर स्ट्रोक’ मराठी पाक्षिकाचे प्रकाशन,चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीतील विसंगती दूर करणार-पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, उद्यासाठीचं रेल्वे वेळापत्रक

vishwatmaklokswamivarta

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta