vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पूलालगतच्या परिसरात मनाई आदेश लागू

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पूलालगतच्या परिसरात मनाई आदेश लागू

 

ठाणे, प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पुलालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खननाबाबत व कांदळवनाची कत्तल होत असून कांदळवनाचे क्षेत्र नष्ट होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे Criminal Writ Petition No. २९११/२०२२ दाखल करण्यात आले आहे. या पार्शवभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी दि.३० मे २०२३ रोजीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कोपर, खाडीलगतच्या परिसरात मनाई हुकूम आदेश लागू केल्यास होणाऱ्या अवैध रेती उत्खननास व कांदळवनाच्या कत्तलीस प्रतिबंध करता येईल, असे निर्देश दिले आहेत.

 

त्यानुसार पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, अति.कार्य, विशेष शाखा, ठाणे शहर श्री. राजेंद्र दाभाडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोपर खाडी किनारी क्षेत्रामध्ये दुपारी 12:01 ते रात्री 12:०० या कालावधीत कोपर खाडी किनारी रेल्वे पुलालगतच्या परिसरात बंदी आदेश जारी केले आहे.

 

हा मनाई आदेश दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी 12:01 ते दि. ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी 12.०० वा पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, अति.कार्य, विशेष शाखा, ठाणे शहर श्री. राजेंद्र दाभाडे यांनी कळविले आहे.

 

0000000000000

संबंधित पोस्ट

मुंबईतील इमारतीच्या 13व्या मजल्यावर चढला महाकाय अजगर; पण गच्चीवरील दृश्य पाहून सारेच हादरले..

बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यशाळा संपन्न; तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई, महाराष्ट्र लोकभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.    

vishwatmaklokswamivarta

मेरीटाइम दिनानिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली

पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित ईको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta