vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मिशन शक्ती” या योजनेच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह“सखी निवास” करीता प्रस्ताव मागवले.

“मिशन शक्ती” या योजनेच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह“सखी निवास” करीता प्रस्ताव मागवले.

 

रायगड प्रतिनिधी

देशाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीशील बदलांमुळे शहरी भागात नोकरी करीता अनेक महिला त्यांचे घर सोडून राहत आहेत अशा नोकरी करणाऱ्या एकल महिला, अविवाहित, विधवा, घटस्फोटित विभक्त, पती बाहेर गावी असलेल्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर पध्दतीने सुरक्षेच्या व्यवस्थेकरीता केंद्र शासन पुरस्कृत “मिशन शक्ती” या योजनेच्या सामर्थ्य या उपयोजने अंतर्गत “सखी निवास” या योजने करीता महिला कल्याण/सामाजिक कल्याण महिलांचे शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थानी जिल्ह्यातील इच्छुक संस्था एजन्सी यांनी दि. १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत.

 

नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह संलग्नकांची यादी

 

१.संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र

 

२. उपविधी आणि मेमोरेंडम ऑफ असोसिएशन

 

३.मागील तीन वर्षांचे वार्षीक अहवाल, लेखापरीक्षण अहवाल ४.व्यवस्थापकीय समिती सदस्यांची यादी, त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्र.,आधार नंबर, पॅन नंबर

 

५.निती आयोगाचे नोंदणी प्रमाणपत्र

 

६.संस्थेचे बैंक तपशील

 

७.सखी निवसासाठी प्रस्तावित इमारतीचा साईट प्लांट

 

८.इमारतीचा तपशीलवार आराखडा त्याच्या आकाराचे खोल्या इ.

 

९. इमारत, खोल्या, किचन, जेवणाचे रुम, प्रसाधनगृहे, स्नानगृहे इ.ची छायाचित्रे

 

१०. इमारतीच्या मालकीचे प्रॉपटी कार्ड तपशील

 

११. इमारत मालक आणि संस्था यांच्यातील करार

 

१२.PWD/ कॉर्पोरेशन द्वारे जारी केलेल्या भाडे पडताळणी प्रमाणपत्र

 

१३. मार्गदर्शक तत्वानुसार योजना चालविण्याचा उपक्रम

 

वरील प्रमाणे अर्हता असणाऱ्या इच्छुक संस्था व एजन्सी अर्हतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव दि. १८/०९/२०२३ पर्यंत सादर करावे. इच्छुक संस्था व एजन्सी विहीत नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिल व बाल विकास अधिकारी रायगड-अलिबाग दीप महल बंगला, दुसरा मजला, स्वामी समर्थ नगर, पिंपळभाट चंडरे, अलिबाग फोन नं. ०२१४१-२९५३२१ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

०००००

संबंधित पोस्ट

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; ३८ जणांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताला ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी संस्थास्तरीय फेरीची कार्यवाही सुरु

चंदिगड एमएमएस प्रकरणात मोहाली पोलिसांची माहिती,कोणत्याही विद्यार्थीनिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, चंदिगड एमएमएस प्रकरणात मोहाली पोलिसांची माहिती..

vishwatmaklokswamivarta

सुधारित प्रशासकीय मान्यता येताच निवकणे धरणाचे काम होणार पूर्ण