vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सुधारित प्रशासकीय मान्यता येताच निवकणे धरणाचे काम होणार पूर्ण

सुधारित प्रशासकीय मान्यता येताच निवकणे धरणाचे काम होणार पूर्ण

 

सातारा प्रतिनिधी

पाटण तालुक्यात केरा नदीवन निवकणे हा लघु पाटबंधारे प्रकल्प वांधकामाधीन आहे. या प्रकल्पास सध्या सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी महामंडळापुढे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही प्रशासकीय मान्यता येताच येत्या दोन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता सं.ग.माने यांनी कळविले आहे.

 

या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे निवकणे धरणग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. तरी या संबंधी धरणाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याने धरणग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्कार घालू नये. तसेच निवडणुकीमध्ये मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा. आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यापासून धरणग्रस्तांनी दूर राहू नये व मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपला हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

00

संबंधित पोस्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या आराम, ईलेक्ट्रीकॅल्स, शिवशाही बस सेवा सुरु करा-बाबासाहेब कोलते 

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी

vishwatmaklokswamivarta

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..  

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन