vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ग्रामीण कन्या सुरक्षा’ गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ..

‘ग्रामीण कन्या सुरक्षा’ गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- ‘ग्रामीण कन्या सुरक्षा’ या गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा आज जिल्हा परिषद शाळा, सातारा येथे अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला

 जिविका फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्यात येत असून क्रेडिटॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या सहकार्याने अंमलात आणला जात आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील एक प्रमुख पण टाळता येण्यासारखा कर्करोग आहे. योग्य वेळी जनजागृती व किशोरवयात HPV लसीकरण केल्यास भविष्यात या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. या मोहिमेंतर्गत ५,००० HPV लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 जिल्हा परिषद शाळा सातारा येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, क्रेडीट ॲक्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष राव, जिविका फाऊंडेशनचे कृणाल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

 अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे म्हणाले की, गर्भाशय मुख कर्करोगमुक्त जिल्हा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘ग्रामीण कन्या सुरक्षा’ सारखे प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. योग्य वयात लसीकरण व योग्य माहिती दिल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. अशा उपक्रमांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे.

या उपक्रमाची वैशिष्ट्येः-• गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय मोहीम• लक्षित गट: शालेय वयोगटातील मुली• वैद्यकीय देखरेखीखाली HPV लसीकरण• CSR अंतर्गत ५,००० HPV लसींचा पाठिंबा• जिल्हा प्रशासन, आरोग्य व शिक्षण विभाग यांचा सक्रिय सहभाग

संबंधित पोस्ट

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

चंद्रपुरात मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

“स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”**जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

इनोव्हेशन’ लोकोपयोगी असावे – पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर

जागतिक आरोग्य संघटनेकडून इबोला उद्रेक ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित; आफ्रिका रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय” प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ