
खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी
[ राज्य प्रतिनिधी
कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सुक्खावर पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये एकूण 20 हून अधिक गुन्हे दाखल होते. यापैकी काही प्रकरण अंडर ट्रायलर तर काहींचा तपास सुरु आहे. सिक्खा हा पंजाबमधील मोगाचा रहिवाशी होता. खोट्या पासपोर्टच्या आधारे तो 2017 मध्ये कॅनडात पळून गेला होता. सुक्खाचे चुलते, आई आणि बहीण कॅनडामध्येच वास्तव्यास आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने जारी केलेल्या 41 दहशतवादी आणि गँगस्टरच्या यादीमध्ये सुक्खाचा समावेश होता. सिक्खावर अज्ञात हल्लेखोरांनी विग्निपेगमध्ये हल्ला केला. या हल्लेखोरांनी सिक्खावर 20 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सिक्खाचा जागीच मृत्यू झाला. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्खा खलिस्तान समर्थकांबरोबर काम करत होता. गुप्त माहितीनुसार सुक्खा दविंद्र बंबीहा गँगचा सदस्य होता. मात्र तो प्रामुख्याने खंडणी मागणे, लोकांना धमकावणे आणि सुपऱ्या घेऊन हत्या करण्याची कामं करायचा. सुक्खा आणि त्याच्या टोळीतील इतर लोक हे वेगवेगळ्या राज्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत आहेत.
काय म्हटलंय बिश्नोई गँगने
लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुकवर सिक्खाच्या हत्येनंतर पोस्ट केली आहे. “हांजी सत् श्री अकाल, सर्वांना राम राम. बंबीहा ग्रुपचा प्रमुख बनून फिरत असलेल्या सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विनिपेगमध्ये हत्या झाली. त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्रोई गँग घेत आहे. हेरॉइनचं व्यसन असलेल्या या नशेखोराने केवळ पैशांसाठी अनेक घरं उद्धवस्त केली. आमचे भाऊ गुरलाल बरडा, विक्की मिड्ड्डूखेडाची हत्या करण्यात याचा हात होता. संदीप नंगल अंबियाची हत्याही त्यानेच घडवून आणली होती. त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली. एकच गोष्ट सांगायची होती की जे काही 2-3 जण राहीले आहेत ते कुठेही पळालेत. जगातील कोणत्याही देशात लपले तरी आपलं वैर संपणार नाही. नक्कीच वेळ कमी जास्त लागू शकतो मात्र प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे,” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



