vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार—महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार—महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

 

रायगड, प्रतिनिधी–महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पुढील काळात ऑनलाइन पद्धतीने वस्तूची विक्री करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून त्याच प्रमाणे कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्यात येतील असे प्रतिपादन राज्याच्या महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

 

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील इंदापूर व गोरेगाव प्रभागात ऊर्जा महिला प्रभाग संघ तलाशेत -इंदापूर व स्वाभिमान महिला प्रभाग संघ -गोरेगाव मार्फत दिवाळी सणानिमित आयोजित विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२ नोव्हेंबर रोजी महीला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, महीला स्वयंसहाय्यता समुहाच्या केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणार असून विक्रीसाठी दुकान-गाळे तसेच वरील मजल्यावर प्रभाग संघाचे कार्यालय करण्यात येईल,असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन महिलांनी केल्याने महिलांचे कौतुक केले .

 

सदर कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उमेद जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश चंद्रकांत राऊळ, गट विकास अधिकारी माणगाव श्री.जठार, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी अशोक चव्हाण, प्रभाग संघाचे , ग्राम संघाचे पदाधिकारी, महीला स्वयं सहाय्यता समूहातील महीला मोठया प्रमाणावर उपस्थित होत्या.

 

सदरच्या विक्री प्रदर्शनात दिवाळी सजावट,फराळ, रांगोळी, शोभेच्या वस्तु, पणत्या, एमिटेशन ज्वेलरी, रेडीमेड कपडे इत्यादी वस्तूचे स्टॉल लावण्यात आले होते. इंदापूर येथे प्रभाग संघामार्फत 10 स्टॉल चे व गोरेगाव येथे 30 समूहाचे स्टॉल लावण्यात आले होते.

०००००

संबंधित पोस्ट

पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी..

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार, इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट ….

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी- मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta