vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणासाठी उपोषण काळातील दुर्घटनेत,जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लक्ष अर्थसहाय मंजूर 

मराठा आरक्षणासाठी उपोषण काळातील दुर्घटनेत,जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लक्ष अर्थसहाय मंजूर

 

जालना, प्रतिनिधी – मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरीता अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण काळातील दुर्घटनेदरम्यान जखमी झालेल्या 22 व्यक्तींच्या उपचारावर झालेल्या खर्चासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून रू. 25,23,375/- (रू. पंचवीस लाख तेवीस हजार तीनशे पंचाहत्तर फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

 

सदर जखमी झालेल्या व्यक्तींवर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटयूट येथे दि. 3 सप्टेंबर 2023 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत उपचार करण्यात आले होते.

 

सदरहू मंजूर अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असलेल्या मुंबई शाखेतून जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे, स्टेट बँक ऑफ इंडिया, शहागंज, छत्रपती संभाजीनगर शाखेतील बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुकर अर्ज प्रक्रिया-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*शांततेत अर्ज प्रक्रिया करण्याचे आवाहन

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस — सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पळस्पे ते कशेडी बोगदा रस्त्याची केली पाहणी

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी सामंजस्य करार३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार निर्मितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार..

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयाने कार्य करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta