vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता  साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहीम..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता  साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहीम..

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु.2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू.6000/- लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

 

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने केंद्र शासनाने दि.6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यानुषंगाने कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

 

या विशेष मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय अधिकारी/कर्मचारी लाभार्थींची योजनेतील सद्यस्थिती (status) तपासणे व eKYC करणे, पोर्टलवर नोंदणी करतांना जमीनीचा तपशिल भरणे, फेस ऑथेंटिकेशन ॲपचा वापर करून eKYC करणे यासाठी शेतकऱ्यांना मदत करतील. तसेच लाभार्थींची बँक खाती आधार संलग्न केली असल्याची खातरजमा करतील. तसेच गावातील योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थीचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी अंती पात्र असलेल्या लाभार्थींना पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करण्यात येईल. तसेच विशेष मोहिमेंतर्गत योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करावयाच्या पात्र लाभार्थींसाठी विशेष ग्रामसभेंचे आयोजनही करण्यात येईल.

 

पी.एम.किसान योजनेचा 16 वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी.एम.किसान योजनेच्या या 45 दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

vishwatmaklokswamivarta

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

उमेद’च्या माध्यमातून बँक आपल्या दारी- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके

1 एप्रिलपासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

vishwatmaklokswamivarta