vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जागतिक वन दिन सामाजिक वनीकरण विभाग आणि प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सायकल रॅली, चित्रप्रदर्शन , व्याख्यनांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली.

 कार्यक्रमास उपवनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीमती सुवर्णा माने, मानद वन्यजीव रक्षक डॉ.किशोर पाठक, विभागीय वन अधिकारी (नियोजन) श्रीमती कल्पना टेमगिरे, विभागीय वन अधिकारी (मूल्यांकन) श्रीमती अश्विनी खोपडे, सहायक वनसंरक्षक श्रीमती आशा चव्हाणक सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती किर्ती जमदाडे-कोकाटे, सहायक वनसंरक्षक श्रीमती सोनिया शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी (सिल्लोड) एस.बी.तांबे, वनीकरण परिक्षेत्र अधिकारी (पैठण) जी.एस.सातपुते, वनीकरण परिक्षेत्र अधिकारी (शहर) अनिल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) सागर कुटे, तसेच संबंधित वनपाल, वनरक्षक इ. उपस्थित होते.

यानिमित्त सकाळी सात वा. वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत्त, कार्यालयाच्या आवारापासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने ५० सायकल स्वारांनी त्यात सहभाग घेतला. महात्मा फुले विद्यालय पद्मपूरा या शाळेतील ५० विद्यार्थी तसेच जनसहयोग, निसर्ग मित्र मंडळ या संस्थेचे भासद कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात विविधप्रकारचे पथनाट्य व मानवी साखळी तयार करुन वनांचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने कार्यालयाच्या अवारात वन्यप्राणी, पक्षी विषयक निवडक चित्रांचे प्रदर्शन, उपक्रमात सहभागी प्रमाणपत्रांचे वाटप तसेच जनजागृतीपर कार्यशाळा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

०००००

संबंधित पोस्ट

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…

vishwatmaklokswamivarta

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र ! १ मे कामगार दिनानिमित्त लेख….

तंबाखुमुक्ती जनजागृती बाईक रॅलीस प्रतिसाद

इलेक्ट्रिक वाहन रॅली उद्या (दि.२९):प्रदूषणमुक्त भविष्यासाठी पुढाकार

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर