vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांना पी.एच.डी.*

उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांना पी.एच.डी.*

राज्य प्रतिनिधी

जालना (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जालना जिल्हा अधीक्षक पराग मोरेश्वर नवलकर यांना ” वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या मानव संसाधन व्यवस्थापन ” या विषयावर संशोधन कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पी.एच.डी .प्रदान करण्यात आली आहे.

 

डॉ. पराग नवलकर यांनी ” द स्टडी ऑफ वर्क लाईफ बॅलन्स ॲंड इट्स इम्पॅक्ट ऑन इफिसेन्सी ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इन पुणे रिजन विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्रा स्टेट एक्साइस डिपार्टमेंट” या विषयावर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील ट्रस्ट संचलित आय. बी.एम.आर.डी इन्स्टिट्यूट चे डॉ.अरुण इंगळे (अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चार वर्षे अथक परिश्रमाने संशोधन करून शोध प्रबंध सादर केला. या दरम्यान तब्बल आठ वेळा त्यांच्या शोध प्रबंधांची विविध चाचण्यांद्वारे तपासणी करण्यात आली.

 

आपल्या कामाचा व्याप सांभाळून पी.एच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.पराग नवलकर यांचा विखे पाटील फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर चे अधीक्षक प्रमोद सोनोने, आय. बी.एम.आर.डी.चे संचालक डॉ. संजय धर्माधिकारी,डॉ. मेघा जैन यांची उपस्थिती होती. विद्या वाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, माजी आयुक्त कांतीलाल उमप, अप्पर आयुक्त यतीन सावंत,संचालक सुनील चव्हाण,सह आयुक्त विश्वनाथ इंदिसे, छत्रपती संभाजी नगर चे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार ,तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी,कर्मचारी , यांच्या सह

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. पराग नवलकर यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी- उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत, उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

व्हाईस ऑफ मीडियाला मिळणार दोन नवे जिल्हाध्यक्ष!कृष्णा सपकाळ यांनी सोपवला प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा…

vishwatmaklokswamivarta

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने 125 वॉर्डनची नियुक्ती करा!-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना