vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची उल्लेखनीय कामगिरी…

 जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची उल्लेखनीय कामगिरी…

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी:- जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ कार्यकारी समिती दि.२८ एप्रिल २०२२ रोजी गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या समितीने उल्लेखनीय कामगिरी करुन आपले कर्तव्य उत्कृष्ठरित्या बजावल्याचे दिसून येते.

 

नुकताच या समितीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील रासायनिक कंपन्या त्यामध्ये चालू स्थितीतील कंपन्या व बंद पडलेल्या रासायनिक कंपन्याची तपासणी करण्याबाबत, हद्दीतील पुर्नवसन केंद्रांना भेटी देवून तेथील व्यसनाधीन लोकांना मार्गदर्शन करण्याबाबत, विविध शाळा व कॉलेज यांना भेटी देवून तेथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन करण्याबाबत निर्णय घेतला. त्याप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कक्ष येथील पोलीस अधिकारी यांनी तात्काळ हा निर्णय अंमलातही आणला.

 

दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ-१, मधील रासायनिक कंपन्यांच्या तपासणीकरिता अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक मंदाकिनी चोपडे, पोलीस हवालदार/४४६३ श्री.दोरे, तसेच समितीतील पदाधिकारी श्री. डेरे, एक्साईज इन्स्पेक्टर हे सदस्य उपस्थित होते. या सदस्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ- १ हद्दीतील खालील रासायनिक कंपन्यांना भेटी देऊन तपासणी केली-

 

युनिक रजिस्ट्रेशन नंबर- MBCD0200052, विजय केमिकल प्लॉट नं. आर-४२२ आणि आर-४२२/०१, टीटी सी इंडस्ट्रियल एरिया, रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई-४००७०१. कंपनीचे व्यवस्थापक अरुण जाधव, मो.नं.9833885735, वापरला जाणारा पदार्थ व त्याचा उपयोग- Anthranili Acid चा वापर हा या कंपनीत Organic pigment बनविण्याकरिता वापरला जातो. कॉन्ट्राबॅन व कंट्रोल्ड सबस्टेन्स बाबत NCB यांच्याकडून लायसन प्राप्त Anthranili Acid c खरेदी ताबा, साठा, सेवन बाबत लायसन्स परवानगी आहे.

 

युनिक रजिस्ट्रेशन नंबर- 321702011900000, भारतीय केमिकल्स प्लॉट नं.w-286, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई-४००७०१. कंपनीचे व्यवस्थापक मो.नं.9322406102, वापरला जाणारा पदार्थ व त्याचा उपयोग Urea, NI चा वापर हा या कंपनीत leave soaping agent बनविण्याकरीता वापरला जातो. कॉन्ट्राबॅन व कंट्रोल्ड सबस्टेन्स बाबत NCB यांच्याकडून लायसन्स प्राप्त Urea, NI खरेदी, ताबा, साठा, सेवन बाबत लायसन्स परवानगी आहे.

 

बंद पडलेल्या व युनिक रजिस्ट्रेशन नंबर नसलेल्या रासायनिक कंपनीबाबत

 

Master Speciality Gasses, R-315, TT MIDC Rabale, Navi Mumbai, ही कंपनी बंद स्थितीत आढळून आली असून त्याजागी सदगुरु मेटल व फर्निचर्स नावाचे दुकान आढळून आले.

 

Edicon mining Equpment Pvt Ltd. R-906, TT MIDC Rabale, Navi Mumbai, ही कंपनी बंद स्थितीत आढळून आली असून त्याजागी डोलमोटर्स प्रा.लि. नावाचे दुकान आढळून आले.

 

Livaco industries R-481, TT Indi Area MIDC Rabale, Navi Mumbai – ही कंपनी बंद स्थितीत आढळून आली असून त्याजागी हायटेक पंप इंडस्ट्रीज प्रा.लि. दुकान आढळून आले.

Cison Expert Pvt.Ltd. R-231, TT Indl Area MIDC Rabale, Navi Mumbai – ही कंपनी बंद स्थितीत असून त्याजागी गारमेंट बनविण्याचे दुकान आढळून आले.

 

1)Hawa Metal Work R-231, TT MIDC Rabale, Navi Mumbai, 2) Silkanas Electrical, 3) NBZ PHARMA LTD, Plot R-247, Indl Area MIDC Rabale, Navi Mumbai, 4) Word Pack Automation system, R-585, TT MIDC Rabale, Navi Mumbai या कंपन्या बंद स्थितीत आढळून आल्या.

 

या पाहणीदरम्यान समितीकडून प्रत्यक्ष साठ्याची तपासणी करण्यात आली. सुरक्षा, यापर व साठवणूक याची तपासणी करण्यात आली. सुरक्षा, कामकाज, कॉन्ट्राबॅन व कंट्रोल्ड सबस्टेन्सचा वापर व त्याची सुरक्षा, चोरी किंवा कामगारांकडून चुकीच्या मार्गाने कॉन्ट्राबॅन व कंट्रोल्ड सबस्टेन्स काढण्यास वाव आहे किंवा कसे याबाबत आढावा घेण्यात आला.

 

व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयांना दिल्या भेटी

 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या खांदेश्वर व तळोजा पोलीस ठाणे ह‌द्दीतील व्यसनमुक्ती केंद्रांना दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी, सहायक पोलीस निरीक्षक मंदाकिनी चोपडे, पोलीस हवालदार श्री. बनकर, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांनी भेट दिली असून त्याबाबची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे-

 

व्यसनमुक्त केंद्र :- आशा की किरण, पत्ता- प्लॉट नं. ६५९, आकाश आर्यन फार्म हाउस जवळ, चेरवली, पो.वाजे, ता. पनवेल, जि. रायगड. व्यसनमुक्त केंद्र चालविणारे नाव- श्री. बशीर कुरेशी, रा. पनवेल मो. नं ९९६७२१३५८१. नशामुक्तीकरिता दाखल असणाऱ्याची संख्या – 110. या केंद्रात नशामुक्त करण्यासाठी 06 प्रशिक्षक आहेत.

 

या व्यसनमुक्ती केंद्रातील सोयीसुविधांचा आढावा घेतला तसेच व्यसनमुक्ती केद्रांतर्गत करण्यात येणाऱ्या पुर्नवसन व जनजागृती कार्यक्रमाची माहिती घेतली असून त्या ठिकाणी अत्यंत योग्य प्रकारे व्यसनाधीन लोकांचे पुनर्वसन होत आहे. या व्यसनमुक्ती केंद्रातील भेटीदरम्यान नशामुक्ती संदर्भात मार्गदर्शन केले व व्हिडीओ क्लिप दाखविण्यात आली. नशामुक्तीच्या दृष्टीने लोकांमध्ये जागरूकता वाढविण्याकरिता तसेच जास्तीत जास्त व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणण्याकरिता सतत प्रयत्न सुरु आहेत.

 

नशामुक्ती अभियानांतर्गत दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी करावे गाव, मैदान, नेरूळ, नवी मुंबई – 35 विद्यार्थी. दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी वाशी रेल्वे स्टेशन, नवी मुंबई – 25 विद्यार्थी. दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी सरोवर विहार, से. ११, बेलापूर, नवी मुंबई – 30 विद्यार्थी. दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी बाळाराम पाटील शाळा व ज्यु. कॉलेज, से. २३, नेरूळ, नवी मुंबई – 70 विद्यार्थी, या महाविद्यालयांना भेट देवून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील शाळा व कॉलेज हे दिवाळी सुट्टी असल्याने बंद आढळून आले. त्यामुळे शाळा, कॉलेजव्यतिरिक्त उद्याने, रेल्वे स्टेशन येथे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथील तरूणांना नशामुक्तीबाबत व्हिडीओ क्लिप दाखवून, अंमली पदार्थाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून, त्यापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले, अशी माहिती गुन्हे शाखा नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी दिली आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सक्षमीकरण उत्सव…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

चिमूर येथे सुरू होणार ‘विद्यार्थी सुविधा केंद्र’आमदार सुधाकर अडबाले यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशाची तात्काळ दखल

महाराष्ट्र राज्यातील भयंकर प्रकार उघडकीस:: शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचा गोरखधंदा , राहुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार…

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातीलपाणी पुरवठा योजनांना गती द्यावी- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईत उद्यापासून होणार ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 चे आयोजन