vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख  नेत्या आर्यन लेडी बहन मायावती जी यांचा वाढदिवस साजरा

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख  नेत्या आर्यन लेडी बहन मायावती जी यांचा वाढदिवस साजरा

 

 

सुरेश गायकवाड यांच्याकडून

[: मुंबई- प्रतिनिधी बहुजन समाज पार्टी दक्षिण  मुंबईच्या वतीने बसपा नेत्या आर्यन लेडी बहन मायावतीचा वाढदिवस मुंबईच्या केंद्रीय कार्यालयात केक कापून पेढे,लाडू वाटप करून साजरा करण्यात आला. त्यावेळेस बसपाचे दक्षिण  मुंबईचे अध्यक्ष महेंद्र शिदे, उपाध्यक्ष कृपाशंकर जैसवार सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

 यावेळी बसपाचे दक्षिण  मुंबईचे उपाध्यक्ष कृपाशंकर जैसवार म्हणाले की, बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहन मायावती ह्या उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री झालावर त्यांनी अनेक विधायक कामे केली. गुंडांना ही जरब बसवली. सध्या ईव्हीएम मशिनच्या मुद्यावर त्यांच्या आदेशावरून आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

बसपा नेत्या आर्यन लेडी बहन मायावतीच्या वाढदिवसाप्रसंगी बसपाचे दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष महेद्र शिंदे म्हणाले कि, त्यांच्या वाढदिवसानिमित आम्ही सर्वांनी असा संकल्प सोडला आहे कि, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना बहुमताने निवडून आणून संसदेत पाठवायचे आहे. आणि त्यांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढायच्या आहे त्यांच्या आदेशावर काम करायचे असून लोकांच्या घरोघरी जाऊन फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे.

 बसपाचे दक्षिण जिल्ह्याचे महासचिव संतोष गायकवाड, अड राकेश गाडेकर, मदन खळे अध्यक्ष शिवडी विधानसभा, विजय हिवाळे प्रभारी चेबूर विधानसभा, सुभाष खैरे, सदस्य कुलाबा विधानसभा सचिन शिंदे सदस्य कुलाबा विधानसभा, परमसुख ओंकार राष्ट्रीय पेन्टर, संतोष जाधव बामसेफ संयोजक कुलाबा विधानसभा, रविंद्र वाव्हळ, अध्यक्ष भाभावन विधानसभा, स्वप्नील साळवी, सदस्य कुलाबा विधानसभा, जैलाल साकेत प्रभारी मुंबादेवी विधानसभा, सखाराम गावडे सदस्य शिवडी विधानसभा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गुणांचा पूजक, माथेफिरू गुणरत्नांचा नाही; शिवसेनेची सदावर्तेवर टोलेबाजी, भाजपवरही टीका

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते 64व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन- लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न…

vishwatmaklokswamivarta

पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*

कल्याण येथील मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

vishwatmaklokswamivarta