vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशन ” मेस्टा ” या राज्यव्यापी संघटनेचे राज्यस्तरीय ९ वे अधिवेशन व सांस्कृतिक महोत्सव २०२४ या वर्षी मुंबईत

महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशन ” मेस्टा ” या राज्यव्यापी संघटनेचे राज्यस्तरीय ९ वे अधिवेशन व सांस्कृतिक महोत्सव २०२४ या वर्षी मुंबईत

 

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशन ” मेस्टा ” या राज्यव्यापी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन व सांस्कृतिक महोत्सव २०२४ या वर्षी मुंबईत होत असल्याची माहिती मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष डॅा. संजयराव तायडेपाटील यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

१८ व १९ जानेवारी ला भायखळा येथे अण्णा भाऊ साठे सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून , शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, मुंबईचे पालकमंत्री व कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे व राज्यातील दोन हजार संस्थाचालक या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

 

या वर्षी प्रथमच देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिक्षण मह्रर्षी पुरस्कार विबग्योर हाय गृप ॲाफ स्कुलचे संस्थाचालक रूस्तोम केरावाला तर जीवन गौवरव पुरस्कार पोदार गृप ॲाफ स्कुलचे संस्थाचालक पवन पोदार , लेखिका विजयाताई वाड व लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांना जाहीर झाले आहेत.

 

राज्यातील निट, जेईई व सीईटी पात्रता परिक्षेत गणवत्तेची टक्केवारी वाढावण्यासाठी मेस्टा टॅलेंट सर्च परीक्षा अधिक व्यापक करणार , इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजीत करून विजेत्यांना पुढील आधिवेशनात पारितोषिक देणार , इंग्रजी शाळेतील विद्यार्थांसाठी जिल्हा व राज्य पातळींवर सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन करणार , आरटिई २५ टक्के राखीव आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थांसाठी शालेय साहीत्य, पुस्तके व गणवेश मोफत मिळावे म्हणुन शासनाकडे पाठपुरावा करणार , मार्च अखेर पर्यंत २५ टक्के राखीव आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची थकीत आरटीई प्रतिपुर्ती रक्कम मिळवुन देण्यासाठीचा लढा तिव्र करणार , शाळांसाठी संरक्षण कायदा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार , शासनाकडुन जबरदस्तीने वसुल करण्यात येणारा मालमत्ता कर व व्यवसायीक दराने घेण्यात येणारे विजबील माफी साठी सरकारकडे अग्रह धरणार , शाळा सोडण्याचा दाखला अनिवार्य करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार , इंग्रजी शाळेच्या शिक्षकांना शासनातर्फे कमीतकमी पेंशन योजना लागु करावी यासाठी पाठपुरावा करणार , शासना तर्फे शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण द्यावे यासाठी आग्रह धरणार या आणि अशा प्रकारच्या सर्वांगीण मागण्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यतील इंग्रजी शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित रहाणार आहेत.

 

राज्यभरातुन येणाऱ्या इंग्रजी शाळा संस्थाचालकामधून ११ उत्कृष्ट ट्रस्टी पुरस्कार , २२ उत्कृष्ट स्कुल पुरस्कार , १८ उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार , ४४ शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. २०२३-२४ मेस्टा- विद्यार्थी केअर टॅलेंट सर्च परिक्षा दिलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांमधुन राज्य पातळींवर प्रथम, द्वितीय, तृतिय गुण प्राप्त विद्यार्थि यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.

 

 

 

.

संबंधित पोस्ट

मुंबई मध्ये 30 वर्षीय मॉडेलची हॉटेल रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ७५० कोटी रुपयांचे विविध कालावधीचे कर्ज रोखे विक्रीस

गोरेगाव येथे भाजपा चे आंदोलन,लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तात्काळ  लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, 

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

मुंबई चर्चगेट येथे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले, आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले…

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…