vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पेन्शन धारकांना न्याय दिला जाईल – विश्वास उटगी 

पेन्शन धारकांना न्याय दिला जाईल – विश्वास उटगी

 

 , मुंबई प्रतिनिधी

मुंबई : सरकारी बँका व निवृत्तीवेतन प्राधिकरण संस्थेमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पेन्शन धारकांना आज हक्काच्या पेंशनला मुकावे लागत आहे. त्यामुळे आता या सर्व प्राधिकरणाच्या मनमानी कारभारविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करून वेळप्रसंगी आंदोलन करून पेन्शन धारकांना न्याय दिला जाईल असे ” ऑल इंडिया एएमसी ऑफिसर असोशिएशन ” चे अध्यक्ष राहुल पोळ व विश्वास उटगी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

 

प्रत्येक आर्थिक वर्षी या सर्व प्राधिकरणाकडून सरकारला अहवाल सादर करायचा असतो. या प्राधिकरणातील काही वरिष्ठ अधिकारी या अहवालात खोटी आकडेवारी सादर करून सरकारची करोडो रुपयांची फसवणूक करत आहेत.असा आरोप विश्वास उटगी यांनी यावेळी केला. अनेक अधिकारी निवृत्त झाले आहेत तरीही त्यांचे भत्ते, मानधन, प्रवास खर्च असे लाखो रुपये अनधिकृतपणे कमवत आहेत. अशा सर्व मनमानी लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादी न्यायालयात सादर करणार असल्याचे पवन अब्रोल यांनी यावेळी सांगितले.

 

सर्वोच्य न्यायालयात याबाबत सर्व पुरावे सादर करत आंदोलनाची तयारीही सुरू केली आहे. सामान्य पेन्शन धारकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालय मधे लढाई लढणार असल्याचे यावेळी राहुल पोळ यांनी सांगितले.

 

.

संबंधित पोस्ट

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

vishwatmaklokswamivarta

विविध गुन्ह्यांतील किमती मुद्देमाल परत घेण्यासाठी संपर्क साधण्याचे ठाणे नगर पोलिसांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत, काय आहे सेक्स टूरिझम 

vishwatmaklokswamivarta

या 2022: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कोणते वॉर्ड आरक्षित? अनेक दिग्गजांना धक्का….

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही  सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे. – कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न