vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशेष पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार-खासदार प्रतापराव जाधव*एकाचवेळी सहा पोस्ट कव्हरचे अनावरण

विशेष पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार-खासदार प्रतापराव जाधव*एकाचवेळी सहा पोस्ट कव्हरचे अनावरण

 

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध स्थळे आहेत. मात्र या स्थळांचा विकास करून प्रचार-प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन डाक विभागामार्फत विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित केले आहे. या पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्यातील सहा पर्यटनस्थळांची माहिती जगभरात होणार आहे. यातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.

 

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्थळांवरील सहा विशेष पोस्ट कव्हरचे अनावरण पार पडले. यावेळी पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते.

 

खासदार श्री. जाधव म्हणाले, पोस्ट विभागाने नाविण्यपूर्ण योजना राबवून आणि इतर विभागांची साथ घेऊन कात टाकली आहे. गाव पातळीपर्यंत पोस्ट बँक पोहोचलेली आहे. तसेच विशेष डाक तिकीट आणि विशेष पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती जगभरात होण्यास मदत मिळेल. एकाचवेळी सहा पोस्ट कव्हरचे अनावरण हा प्रसंग पहिल्यांदाच घडून आला आहे. यानिमित्ताने सहा पर्यटनस्थळे आणि इतरही ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होईल. त्यामुळे पोस्ट विभागाने याकामी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

श्रीमती मधाळे यांनी पोस्ट विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. फिलाटेलीच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांवर स्पेशल पोस्ट कव्हर प्रकाशित करण्यात येत आहे. यामुळे या स्थळांची माहिती जगभरात होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने इतरही ठिकाणे आहेत, याची माहिती फिलाटेलीच्या माध्यमातून समोर यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. या पर्यटनस्थळांची माहिती राज्यात इतर ठिकाणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात अनेक ‍ठिकाणे ही पर्यटनदृष्ट्या महत्वाची आहेत. त्यांची माहिती झाल्यास याठिकाणी पर्यटक येऊन जिल्ह्यातील पर्यटनास वाव मिळेल. जिल्ह्यातील शेगाव विकास आराखडा पूर्णत्वास आला आहे. लोणार आणि सिंदखेड राजा विकास आराखडा तयार करण्यात आला असून विकासकामांना सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांगसुंदर पर्यटनस्थळे तयार होण्यास मदत होईल. तसेच लोणार सरोवर हे जागतिक वारसास्थळाच्या यादीत यावे, यासाठी प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी प्रास्ताविकातून राजमाता माँ जिजाऊसाहेब, लोणार सरोवर, दैत्यसूदन मंदिर, कमलजा देवी मंदिर, संत श्री गजानन महाराज मंदिर, आंबाबरवा अभयारण्य या पर्यटनस्थळांवर विशेष पोस्ट कव्हर तयार करण्यात आल्याचे सांगितले. डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी आभार मानले.

 

000000

संबंधित पोस्ट

आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर प्रवेशाकरीता-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

.मुंबईतील प्रसिद्ध गणपती ‘लालबागचा राजा’चा फर्स्ट लूक चे  झाले लोकांना दर्शन..

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा महार्गावरील वाहतूक 16 तासांपासून ठप्प..

vishwatmaklokswamivarta

नागपूरच्या विकासासाठी एनएमआरडीए, एनबीसीसी आणि हुडको यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी*कृषि विभागाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ